Pages

Upahar Dandawat Vidhi

  • उपहारानंतर दंडवत घालतांना कोणती प्रार्थना म्हणावी?

  • मी अनंता सृष्टी वंचकत्व दोष जोडले. एकाईसाच्या परी ईश्वराचे ठाई तथा तत्परायणाच्या ठाई काही उत्तम क्रिया घडत नाही. 
     
  • असा मी वंचकी, स्वार्थी, कामी, क्रोधी, मदमत्सरी, अहंकारी, दंभ, गर्व मठाराने भरलेला आहे. या संसार चक्रामध्ये गुरफटलो जी.
     
  • स्वामिया श्री चक्रधरराया तरी माझी कणवा करोनी प्रसन्न होवुनी आरोगणा अंगी कराविजी महाराज ! या संसार रुपी भवचक्रा पासून सोडविता तूच एक समर्थ आहेस. स्वामिया, आपले प्रेमदान द्यावे जी !
     
  • अनंता सृष्टी माझे मुख न पहावे अशी माझी हीन क्रिया आहे. स्वामी श्री चक्रधरराया तू कृपाळू, कनवाळू, दयाळू, मायाळू आहेस.
     
  • माझी दीन दुर्बळाची आरोगणा कराविजी महाराज ! श्री चक्रधरराया! श्री दत्तात्रेय प्रभू महाराज !
द्वापारी श्रीकृष्ण महाराज... शरण

सह्याद्री श्री दत्तात्रय... शरण

द्वारावातिकार श्रीचक्रपाणी महाराज... शरण

रिद्धापुरी श्री गोविन्द्प्रभु महाराज... शरण

श्री चक्रधरराया महाराज... शरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा