अभ्यागतास (मुनीवर) बाबाजी यांशी भेटतांना__
श्री चक्रधर स्वामी म्हणतात__
"भ्रमत भ्रमता भेटी कां आपजौनी भेटी "
"एकमेका भेटलिया हे भेलीयाचा पाड जाए"
"एक देव एक धर्म तया परमप्रीती होआवी"
"तुम्ही अच्युत गोत्रिय की गा, तुम्हा परस्परे परमप्रीती होआवी" "ज्ञाता विरक्ताचा संग कीजे" 'उजळेयाचेन संगे मैळला उजळे' एथीचेया संबंधाचिया संबंधा जाईजे मग तो म्हणे ते कीजे'
"देव दुर्लभ का देवाते आठविता दुर्लभ म्हणोन साधुसंत दुर्लभाचे दुर्लभ."
श्री चक्रधर स्वामींचे वरील वचने मनात आठवीत भेटावे, परंतु जीवावर ईश्वर बुद्धी नसावी....
अभ्यागतास भेटल्यावर "उदक भोजन" ग्राहनार्थ दण्डवत घालतांना__
आपण ईश्वराचे राजकुमार, दुर्लभाचे दुर्लभ आहात ! आपले पाय, आमचे ठाई दिसले तेव्हा प्रशस्त वाटले तो पर्यंत उदक, भोजनाचे निमंत्रण दंडवत स्वीकार करावे हि विनंती...
भोजन समयी संत महात्मे यांना संकल्प सोडतांना___
(निर्हेतुक उदक (पाणी) हातावर सोडून)
"अन्नदान श्री चक्रधरार्पण"
(निर्हेतुक उदक (पाणी) हातावर सोडून)
"द्रव्यदान श्री चक्रधरार्पण"
अथवा कोणतेही दान देतांना "श्री चक्रधरार्पण" असे म्हणावे...
अधिकर्ण, संत महात्मे यांना जेऊ घालतांना दण्डवत घालते वेळी__
बाबा, तुम्ही उत्तम प्रकारे साधन आचरणारे ईश्वरीचे साधनवंत आहात. तुम्ही परक्यावर उपकार करणारे, भले चिंतीणारे साधू आहात. वास्तविक आपणास स्वर्गातील अमृतादी पदार्थ आणून जेऊ घालावे. माणिक-रत्नांनी पूजा करावी अशी तुमची योग्यता आहे. परंतु मी दैवहीन खांतीचा प्राणी आहे. माझ्या जवळ आपणा योग्य खाद्य पदार्थ, द्रव्य पदार्थ काहीच नाही. भाव, प्रीती, श्रद्धा तर मुळीच नाही, मज गरीबाची भाजी-भाकरी प्रसन्न होऊनी स्वीकार करा. तुम्ही स्वामीरायास हि अल्पशी क्रिया स्वीकारात घेण्यास सांगा.
श्री चक्रधररायास, हे सकळ ही देवाचे तुझे तुलाच श्री चक्रधरार्पण...
श्री कृष्ण चक्रवर्तीस माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
श्री दत्तात्रेय प्रभूस माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
श्री चक्रपाणी महाराजास माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
श्री गोविंद प्रभू बाबांना माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
श्री चक्रधररायास माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा