- उपहारानंतर दंडवत घालतांना कोणती प्रार्थना म्हणावी?
- मी अनंता सृष्टी वंचकत्व दोष जोडले. एकाईसाच्या परी ईश्वराचे ठाई तथा तत्परायणाच्या ठाई काही उत्तम क्रिया घडत नाही.
- असा मी वंचकी, स्वार्थी, कामी, क्रोधी, मदमत्सरी, अहंकारी, दंभ, गर्व मठाराने भरलेला आहे. या संसार चक्रामध्ये गुरफटलो जी.
- स्वामिया श्री चक्रधरराया तरी माझी कणवा करोनी प्रसन्न होवुनी आरोगणा अंगी कराविजी महाराज ! या संसार रुपी भवचक्रा पासून सोडविता तूच एक समर्थ आहेस. स्वामिया, आपले प्रेमदान द्यावे जी !
- अनंता सृष्टी माझे मुख न पहावे अशी माझी हीन क्रिया आहे. स्वामी श्री चक्रधरराया तू कृपाळू, कनवाळू, दयाळू, मायाळू आहेस.
- माझी दीन दुर्बळाची आरोगणा कराविजी महाराज ! श्री चक्रधरराया! श्री दत्तात्रेय प्रभू महाराज !
द्वापारी श्रीकृष्ण महाराज... शरण
सह्याद्री श्री दत्तात्रय... शरण
द्वारावातिकार श्रीचक्रपाणी महाराज... शरण
रिद्धापुरी श्री गोविन्द्प्रभु महाराज... शरण
श्री चक्रधरराया महाराज... शरण
सह्याद्री श्री दत्तात्रय... शरण
द्वारावातिकार श्रीचक्रपाणी महाराज... शरण
रिद्धापुरी श्री गोविन्द्प्रभु महाराज... शरण
श्री चक्रधरराया महाराज... शरण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा