उपहार विधी
महानुभाव पंथीयांना उपहार दाखवितांना काय म्हणावे?
सामान्यतः उपहार दाखवितांना ---
१. श्रीकृष्ण भगवंता, तुम्ही रुख्मिणी देवीचे भोजन नित्यदिनी स्वीकार केले, सुदाम्याचे पोहे, विदुर भक्ताच्या कण्या आरोगण केल्या. तशी माझी भाजी भाकर स्वीकार करावी जी!
द्वापारी श्रीकृष्ण महाराज... शरण (पहिले नाम घ्यावे)
२. श्री दत्तात्रय महाराजा, तुम्ही कोल्हापुरी भिक्षा माघून पांचाळेश्वर आत्मातीर्थी नित्य भोजनासी येता तद्वत
माझं ठाई येऊन मज गरिबाचे भोजन करावे जी !
सह्याद्री श्री दत्तात्रय... शरण (द्वितीय नाम घ्यावे)
३. श्री चक्रपाणी महाराजा, तुम्ही नित्यदिनी जाणकाईसा मातेचा आरोगणा स्वीकार केला. द्वारावातीच्या भक्तांचे अनेक वर्ष भोजन स्वीकार केले. तसे मज दीनाचे स्वीकार करावे जी!
द्वारावातिये श्रीचक्रपाणी महाराज... शरण (त्रितीय नाम घ्यावे)
४. श्री गोविन्द्प्रभू महाराजा, रिद्धपुरी राजमठी, आबाईसा महाईमभट्, भातोबासाचे भोजन स्वीकार केले, महादाईसाचे धिरडे, अमृतफळे, महाईमभटाचा गुळ, द्रविडाची आरोगणा स्वीकार केली, तशी माझी भाजी भाकर स्वीकार करावी जी!
रिद्धापुरी श्री गोविन्द्प्रभु महाराज... शरण (चतुर्थ नाम घ्यावे)
५. स्वामी श्री चक्रधरराया, तुम्ही बाईसाचा पाणीभात स्वीकार केला, बोणेबाई यांचा पाणीभात, मुक्ताबाईची कंदमुळे, साधाचा चनक-साक, (हरभरा भाजी) , आबईसाच्या पुरीया, महादाईसाची केळे भाईदेवाची उष्टी बोरे, मातंगाचा लाडू, उपाधबासाची चणेरोटी आरोगणा केली, तसे माझे भोजन स्वीकार करून आरोगणा करावीजी !
प्रतीस्थानी श्री चक्रधाराया महाराज... शरण (पाचवे नाम घ्यावे)
सकाळी दुध अगर चहा उपहार दाखवितांना काय म्हणावे?
पाटवधा राही नायक म्हणाले- "जी जी माते साकरी नांवे म्हैसी असे. तिचा तांबिया भारी दुध मी प्रतिदिनी गोसाविया लागी व्याळी कारणे आणीन. गोसावी मानीले. तैसे माझे दुध तथा उष्णोदक चहा स्वीकार करावा जी !
श्री चक्रधाराया महाराज... शरण
दंडवत
जय श्रीकृष्ण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा