Prayer - आरती नंतर प्रार्थना

आरती नंतर कोणती प्रार्थना म्हणावी?


  • हे 'प्रभू'! विभू ! सच्चिदानंदघन परमेश्वरा करुणार्णवा ! तू दयाळू, कृपाळू, कनवाळू आहेस.
  • तू आर्तदानी, अनिमित बंधू जीवोध्दरण व्यसनी, शरणांगत वज्रपंजर आहेस.
  • तू अनाथनाथ भक्तवत्सल, पतितपावन नित्यमुक्तीदायक आहेस.
  • तू सकलगुणनिधान, सर्वसाक्षी, अच्युत, अविनाशी मंगलकारक आहेस.
  • मी मळसृष्टीपासून अनंत जन्माचा अनाचारी आहे.
  • काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादी अनेक दोषांनी नखशिखांत भरलेला आहे.
  • मी अनंत सृष्टीचा प्रमादिया असून कुटील, अधम, पामर, क्रूर, निष्ठुर, घातकी आहे.
  • मी राजसी, तामसी, अहंकारी, अविचारी, दोषदर्शी, वर्मस्पर्शी, गुरुद्रोही, मार्गद्रोही, विश्वासघातकी, नित्यनर्की व अपवित्राहून अपवित्र आहे. किंबहुना मी सर्व दोषांचे आळे आहे.
  • माझ्या कडून कळत नकळत जी पापे घडली असतील त्या सर्वांची सदयांत:करणाने क्षमा करावी.
  • इष्ट क्रिया घडवून सकळ अनिष्टांपासून रक्षावेजी !
  • आपले ज्ञान-दान, प्रेमदान, भक्तीदान देवून व सेवादास्य घडवून मज अपवित्राते पवित्र करावेजी !
  • या दु:खमय संसारापासून सोडवून मज किंकराला आपल्या आनंद स्वरूपी  पावन करावे जी.



सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणी माझे साष्टांग दंडवत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा