Mahanubhaviya Devpooja

देवपूजा - ३ 


देवास अवाहन करताना काय म्हणावे?
परब्रह्म श्री चक्रधरायानम: अवाहयामी ......!

विशेष श्री मूर्ति असनावर ठेवताना काय म्हणावे?
आसनं समर्पयामी अथवा श्री चक्रधरायानम:सुप्रतिष्ठितमस्तु.....!

श्री चरण सेवा कशी करावी?
पाद्यं समर्पयामी (श्री चरण सेवा करावी)......!

उदक (पाणी) ग्राहनार्थ प्रार्थना कोणती?
अर्द्य समर्पयामी (पाणी अर्पण करावे)......!

श्रीकर प्रक्षालनार्थ काय म्हणावे?
अचमनिये समर्पयामी.......!

श्रीमुर्तिस, विशेषास स्नान घालताना काय म्हणावे?
स्नानं समर्पयामी महाभिषेक स्नानं समर्पयामी (असे म्हणून पाणी घालावे)......!

वस्त्र अथवा उपवस्त्र वाहताना काय म्हणावे?
वस्त्रं समर्पयामी उपवस्त्रं समर्पयामी (असे म्हणून प्रथम व दुसरे वस्त्र अर्पण करावे).......!

गंध लावताना काय म्हणावे?
बाईसे गोसवियांचा भाळप्रदेशी गोपी चंदनाचा उर्ध्व प्रौंड्र तिलक रेखिती तद्वत तिलकं समर्पयामी.......!

अक्षता लावताना काय म्हणावे?
अक्षता समर्पयामी......!

फूल वाहताना काय म्हणावे?
पुष्पं समर्पयामी......!

फूल, फळ, नारळ, विडा अर्पण करताना (वाहताना) काय म्हणावे?
पत्रं, पुष्पं, फलं, तोयंयो में भक्त्या प्रयच्छति| तदहं भक्त्युपह्रतमष्णामी प्रयतात्मना: ||

अगरबत्ती, धुप (उद) दाखवताना काय म्हणावे?
धूपं समर्पयामी......!
धुपायने परमसुंदर दिव्यवन्ता, अंगार तो वरी तया अतियुक्तराता  | त्यहिवरी घालुनी दशांगमंदवाते, कल्लोळ धूपं बहु दाखवितात भक्ते | किंवा उत्तम धूपं दीपं सुगंधं परमेश्वर हेतुं पुरविला सर्वत्र सदभावे जगतु......!

उपहार (भोजन) दाखवताना काय म्हणावे?
नैवेद्यं समर्पयामी......!
संकल्प सोडवताना... हे सकळही देवाचे ! देव देइल ते माझे ! सर्व कर्म धर्मं श्री चक्रधरार्पण ! श्री कृष्णार्पण...!

स्वीकार करा ही प्रार्थना--- परमेश्वराच्या पांची अवतारास माझे नमस्कार, आनंदमय परमेश्वरातुनी, दिव्य कृपा शक्ति निष्पन्न होऊनी, ॐ मायेतुनी, पद्मासनी उपविष्ठ होऊनी श्री करे ग्रास घेऊनीश्री मुखी घालावेजी श्री चक्रधरराया ही आरोगना करावी जी ......!

अथवा

स्वामी श्री चक्रधरराया मज अपवित्राते पवित्र करोनी, माझी क्रिया स्विकारात घ्यावी. माझ्या विकल्पित राजस, तामस स्थान तथा अन्न याते क्रुपवालोकने पवित्र करोनी स्वीकार करावे जी श्री चक्रधरराया......!


1 टिप्पणी:

  1. Dandawat Pranam,

    One of our respected visitor and follower of Mahanubhav Panth, appealed to stop writing stating that "prachar ani prasar he aaple uddesh nahi. sarva, guru kadun janun ghyave. I request you to delet the all blogs".

    Thank you for your feed back.
    Dear reader, I request you to share your views on this issue, if you all feel I will surely stop this.

    उत्तर द्याहटवा