devpooja लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
devpooja लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Mahanubhav Panth

वसुदेवसुतं देवम कंस चाणूरमर्दनम |
देवकी परमानंदनंम कृष्ण वंदे जगदगुरूम ||१||

सह्याद्रीशिखरे रम्यंम, अत्रीअनसूयानंदनंम |
स्तम वंदे परमानंदनंम श्री दत्तात्रय जगदगुरु ||२||

फलस्थ नगरे जातं द्वारावत्यानिवासिनाम |
नौम्यहं चक्रपाणीकं जनाकाद्विजनंदनंम ||३||

नेमाम्बोदर संभूतं कान्हवानंत नायकात |
प्रभू नमामी गोविन्दम जीवविद्या विभंजकम ||४||

पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्ती प्रदायकम |
माल्हनी परमानंदनंम वंदे श्री चक्रधर विभूम ||५||   


श्री चक्रधरार्पण


दण्डवत प्रणाम

Mahanubhav Panth - प्रातः काळ प्रार्थना

प्रातः काळ प्रार्थना

प्रभात काळी जननी यशोदा
                          उठी उठी वा म्हणे मुकुंदा
गोपाल येती तुजला वाहाती |
                                  गोविंद दामोधर नाम घेती ||१||
प्रभात काळी सैह्याचळासी |
                               उपहूड  झाला प्रभू राउळासी |
मुनिवृंद उभे रायांगणासी |
                            सुरवर दुदुंभी गर्जे आकाशी  ||२||
प्रातःसमयी श्री चक्रपाणी |
                             फलस्थ ग्रामी जनकाईधामी |
रम्भाईसाचा निज प्रिय ताता |
                             जीवास चिंती सदा हितकर्ता ||३||
उषांतकाळी प्रभू रिद्धपुरी |
                              स्वच्छ्ध लिळा कृपा विहारी |
नासोनी दु:खे विमला कृमीचे |
                                         करी प्राप्त स्वामी अधिकार त्यांचे ||४||
पश्चात पहारी तो राजविहारी |
                            चिंतीत जीव सदा हितकारी |
नागांबा प्रश्ने प्रभू थाप चिंती |
                                 रुपांबा प्रश्ने तो जीव चिंती ||५||
हारोनी बाधा कुळपंचचार्या |
                             वामन पेंधी जिववी सुभार्या |
श्री मृत्युंजया विनवी पुजारी |
                                    नासोनी दु:खे भव रोग हारी ||६||



सर्वज्ञ श्री चक्रधर राया तुझ्या चरणी माझे कोटी कोटी दण्डवत.....
प्रभो! माझीया दासाची सेवा स्वीकार करावी.....
माझीया हातून धर्माचे कार्य घडावे व तुझ्या चरणी सदैव स्थान मिळावे हीच अपेक्षा.....

Mahanubhav Panth - Mangal Snan Vidhi

 महानुभाव पंथ - मंगल स्नान विधी


विशेष तथा स्थानांचे चरणोदक काढतांना (घेतांना) काय म्हणावे? 

जी जी! स्वामी श्री चक्रधरराया, लाहामाईसा ज्वरी पडताळली. नित्यदिनी तिला उचीष्ट प्रसाद व चरणोदक दिले, सर्पद्रष्ट माळीया चरणोदक देऊनी रक्षीले. ललिताईसाची काळस्फोट व्यथा हरिली. तैसे मज "श्री चरणोदक" देऊनी सकळ दु:खापासुन रक्षावे जी श्री चक्रधरराया... ! "जीव, प्रपंच, व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर एक अती" तो  सर्व शक्तीयुक्त: ऐसा चैतन्यापर परेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवते रक्षिता हो! उद्धरिता हो!


देवपूजा तथा स्थानास "मंगल स्नान" किंवा उटी घालण्याविषयी दण्डवत घालून कोणती प्रार्थना म्हणावी?

"हे स्वामी श्री चक्रधरराया ! श्री पंचअवतारा ! माझ्या मंगल स्नानाचा स्वीकार करावाजी!"



Epic of Maharabharata

Shri Madbhagwad Geeta Adhyay 12 and 15, you may listen online as well as download directly on your computer.

श्रीमदभगवदगीता

|| गीता शास्त्र प्रमाणित विधी ||

इतर देव देवतांचे धर्माचा त्याग करून मला एकट्याला शरण ये, माझ्याच ठायी मन ठेव, माझाच भक्त हो, माझीच उपासना कर, मलाच नमस्कार कर, माझ्या कृपा प्रसादाने सर्व पापा पासून मुक्त होऊन मलाच येऊन मिळशील, परम शांती, मोक्ष प्राप्त होईल... गीता अध्याय १८ श्लो. ६२, ६५, ६६


मेरी उपासना कर, मुझमे शरण आ

Adhyay - 12 : Bhakti Yog
Adhyay - 15 : Purushottam Yog

Adhyay - 12 : Bhakti Yog
Adhyay - 15 : Purushottam Yog


Subscribe for more adhyayas and downloads.

Chakradhar - भोजन विडा


देवास "भोजन विडा" (पान) अर्पण करतांना काय म्हणावे?

श्री कृष्ण भगवंता तुम्ही, रुख्मिणी देवीचे तांबोळ (पानाचा विडा) नित्यदिनी स्विकार केले. 

श्री चक्रधरराया बाईसा नित्यदिनी सकर्पूरा फोडी (सुपारी) ओळगविती, विडिया करुनी देती, भटोबास सकर्पूरा फोडी तथा विडा अर्पण करीत. 

तद्वत माझा विडा स्विकार करावा जी ! श्री चक्रधरराया


Arti - आरती ओवाळतांना

आरती ओवाळतांना काय म्हणावे ?

जय तू मंगला ! परम मंगल रूपा ! 
सुंदर नागरा ! पतित पावना ! 
अव्यक्ता ! अनंता ! सच्चिदानंद रूपा ! 
परमेश्वरा ! नीत्यमुक्ती दायका ! चैतन्य परात्परा ! 
यती-मुनी-वेषधारका ! श्री चक्रधरा ! शरणांगता ! 

वज्रपंजरूपा ! तू अर्तदानी ! अनिमित बंधू ! जीवोद्धरण व्यासनिया ! 
तुज पंचप्राणारती ओवाळीतो ! 
तरी कृपादी गुणेकरुनी स्वीकारावेजी स्वामिया मज सेवकासी सन्निधानस्थित करोनी कैवल्यानंद ज्योतीचा सोलीव आनंद द्यावा जी !!! 
श्री चक्रधरराया......! 


मंगलरूपा 


Mahanubhav Devpooja - महानुभाव देवपूजा

महानुभाव देवपूजा



     सामान्यत: आजच्या धावपळीच्या जीवनात आपण साधू-संतांचा सहवास लाभत नाही, त्यामूळे पंथाविषयी आवश्यक ज्ञान लाभत नाही. परंतु या दैनंदिनी सुद्धा परमेश्वराचे चिंतन ध्यान करणे किती महत्वाचे आहे हे सांगण्याची गरज वाटत नाही... या लेखाद्वारे मी आपणास देवपूजे संबंधी असलेले ज्ञान सादर आहे...


  • देवपूजेस शक्यतोवर रोज अथवा बुधवार/शुक्रवारी स्नान घालावे.
  • दर रोज उपहार दाखवावे, परंतु उचीष्ट होणार नाही याचे विशेष काळजी करावी.
  • घरात आणलेले पदार्थ, वस्त्र, धन-धान्य, फळे इत्यादी प्रथम कृष्णार्पण करावे
  • देवपूजा धूळ, धूर, कचरा यांपासून दूर ठेवावी
  • वस्त्र प्रसादाची विशेष दक्षता घ्यावी- दर चौथ्या दिवशी सोडून नामास करावा, पुष्पं/धूपं/उपहार दाखवा.
  • सायंकाळी घरातील सर्व सदस्यांनी मिळून आरती/प्रार्थना म्हणावी व किमान पाच साष्टांग दंडवत घालावे.
  • आपण कधीही बाहेरून, नपाळत्या ठिकाणाहून किंवा कामावरून आलात तर प्रथम हात-पाय धुवून "विशेष" नमस करावा व मगच पाणी/अन्न ग्रहण करावे.
  • परिसरातील उपदेशी यांनी मिळून दर शुक्रवारी व  पोर्णीमेस सामुदाईक देवपूजा करावी व आरती/भजन तथा नामस्मरण करावे

Upahar Dandawat Vidhi

  • उपहारानंतर दंडवत घालतांना कोणती प्रार्थना म्हणावी?

  • मी अनंता सृष्टी वंचकत्व दोष जोडले. एकाईसाच्या परी ईश्वराचे ठाई तथा तत्परायणाच्या ठाई काही उत्तम क्रिया घडत नाही. 
     
  • असा मी वंचकी, स्वार्थी, कामी, क्रोधी, मदमत्सरी, अहंकारी, दंभ, गर्व मठाराने भरलेला आहे. या संसार चक्रामध्ये गुरफटलो जी.
     
  • स्वामिया श्री चक्रधरराया तरी माझी कणवा करोनी प्रसन्न होवुनी आरोगणा अंगी कराविजी महाराज ! या संसार रुपी भवचक्रा पासून सोडविता तूच एक समर्थ आहेस. स्वामिया, आपले प्रेमदान द्यावे जी !
     

Uphar Vidhi (उपहार विधी)

उपहार विधी



महानुभाव पंथीयांना उपहार दाखवितांना काय म्हणावे?

सामान्यतः उपहार दाखवितांना ---

१. श्रीकृष्ण  भगवंता, तुम्ही रुख्मिणी देवीचे भोजन नित्यदिनी स्वीकार केले, सुदाम्याचे पोहे, विदुर भक्ताच्या कण्या आरोगण केल्या. तशी माझी भाजी भाकर स्वीकार करावी जी!

द्वापारी श्रीकृष्ण महाराज... शरण (पहिले नाम घ्यावे)

२. श्री दत्तात्रय महाराजा, तुम्ही कोल्हापुरी भिक्षा माघून पांचाळेश्वर आत्मातीर्थी नित्य भोजनासी येता तद्वत 
माझं ठाई येऊन मज गरिबाचे भोजन करावे जी !

सह्याद्री श्री दत्तात्रय... शरण (द्वितीय नाम घ्यावे)

३. श्री चक्रपाणी महाराजा, तुम्ही नित्यदिनी जाणकाईसा  मातेचा आरोगणा स्वीकार केला. द्वारावातीच्या भक्तांचे अनेक वर्ष भोजन स्वीकार केले. तसे मज दीनाचे स्वीकार करावे जी!

द्वारावातिये श्रीचक्रपाणी महाराज... शरण (त्रितीय  नाम घ्यावे)

Mahanubhaviya Devpooja

देवपूजा - ३ 


देवास अवाहन करताना काय म्हणावे?
परब्रह्म श्री चक्रधरायानम: अवाहयामी ......!

विशेष श्री मूर्ति असनावर ठेवताना काय म्हणावे?
आसनं समर्पयामी अथवा श्री चक्रधरायानम:सुप्रतिष्ठितमस्तु.....!

श्री चरण सेवा कशी करावी?
पाद्यं समर्पयामी (श्री चरण सेवा करावी)......!