प्रातः काळ प्रार्थना
उठी उठी वा म्हणे मुकुंदा
गोपाल येती तुजला वाहाती |
गोविंद दामोधर नाम घेती ||१||
प्रभात काळी सैह्याचळासी |
उपहूड झाला प्रभू राउळासी |
मुनिवृंद उभे रायांगणासी |
प्रातःसमयी श्री चक्रपाणी |
फलस्थ ग्रामी जनकाईधामी |
रम्भाईसाचा निज प्रिय ताता |
जीवास चिंती सदा हितकर्ता ||३||
उषांतकाळी प्रभू रिद्धपुरी |
स्वच्छ्ध लिळा कृपा विहारी |
नासोनी दु:खे विमला कृमीचे |
करी प्राप्त स्वामी अधिकार त्यांचे ||४||
चिंतीत जीव सदा हितकारी |
नागांबा प्रश्ने प्रभू थाप चिंती |
रुपांबा प्रश्ने तो जीव चिंती ||५||
हारोनी बाधा कुळपंचचार्या |
वामन पेंधी जिववी सुभार्या |
श्री मृत्युंजया विनवी पुजारी |
नासोनी दु:खे भव रोग हारी ||६||
सर्वज्ञ श्री चक्रधर राया तुझ्या चरणी माझे कोटी कोटी दण्डवत.....
प्रभो! माझीया दासाची सेवा स्वीकार करावी.....
माझीया हातून धर्माचे कार्य घडावे व तुझ्या चरणी सदैव स्थान मिळावे हीच अपेक्षा.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा