देवपूजा
श्री चक्रधर स्वामी म्हणतात पश्चात प्रहरी उठीजे
परमेश्वर साधकाने प्रातकाली उठावे. आलस्य परिहार करुन मुखमार्जन करावे. मग रज, तम रहित शुद्ध परदेशी एकांत जागी देव घरात कपदाचे आसन करावे, त्यावर उत्तराभिमुख दंडवत घालून वज्रासन, कुर्मासन अथवा पद्मासनी बसावे. उत्तराभिमुख बसने शक्य नसेल तरच समयोचित कोणतीही दिशा ग्राह्य आहे. एकेरी शुद्ध कापडाचे पांघरुण तोंडावर घ्यावे. त्यावेळी निदान १०८ मन्यांच्या १५ गाठी स्मरण करावे. म्हणजे दीड तास स्मरण पाचव्या नामाचे केलेच पाहिजे. कारण एने अवतारे जो नुधरे तो काहीच नधुरे.
तव अरुणोदयो होवे
देवपूजे पूर्वी काय करावे?
सकाळी प्रात:विधि आटोपल्यानंतर आपले दोन्ही हात गाळलेल्या पाण्याने धुवून घ्यावे. परिमार्जन म्हणजे एक वस्त्र देवपूजे जवळ नित्य असू द्यावे, त्याने हात कोरडे करावेत. नंतर हाताना इतर कोणत्याही वास्तु अथवा वास्त्राचा स्पर्श करू नये. देवपूजेवरिल वस्त्र बाजुला करावे. मग आसनावरिल विशेष दोन्ही हातानी ताल्हात्वर धरावा. त्या विशेषवर मान वाकवून कपल ठेवावे. कारण श्री चक्रधर स्वामी म्हणतात-
"एथ नमस्कार कीजे एथिचिया संबंधा गेले तेतुले ओटे-गोटे आदिकरोनी तुम्हा नमस्कर्निया की गा; माँ येसनी देमती कैसी डावल्ली?"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा